शिक्षण विभाग (प्राथमिक)
प्रस्तावना:-नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्गत इयता 1 ते 8 वी च्या मुलांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येते. जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे विभाग प्रमुख असुन तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी हे तालुक्याचे विभाग प्रमुख असतात. इयता 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत केंद्रशासन पुरस्कृत व राज्यशासन पुरस्कृत अशा विविध योजना राबविल्या जातात.
विभागाचे ध्येय:-
1.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वंये ची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे.
2.विदयार्थ्याना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविणे. उदा.मिशन उत्कर्ष अंतर्गत अध्ययनस्तर निश्चिती, उपचारात्मक अध्ययन, अध्यापन (शिष्यवृत्ती सराव परीक्षांचे आयोजन शाळास्तर व FLN जिल्हास्तरावर
3.जिल्हा परिषद संचलित सर्व प्राथमिक शाळांना भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देणे
4.दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साधने (Digital Clasroom) व तंत्रज्ञ उपलब्ध करुन देणे.
5.विदयार्थ्यांच्या बौध्दिक शारीरिक दृष्टया सक्षम होण्यासाठी विविध स्पर्धांचे नियोजन व आयोजन करणे.
उद्ष्टिे आणि कार्ये:-
शिक्षण समितीच्या बैठका वेळोवेळी घेण्याची तरतूद आहे. या बैठकीच्या कामकाजात शिक्षण समितीमधील सर्व जिल्हा परिषद सदस्य सहभागी होतात.या बैठकीचे आयोजन शिक्षण विभागाने केले आहे. शिक्षण समितीच्या सभेसाठी विषय पत्रिकेची सूचना सभेच्या 10 दिवस आधी पावली जाते. सभेचे इतिवृत्त माननीय अध्यक्ष, शिक्षण समिती यांच्या मान्यतेने घेतले जाते आणि अंतिम केले जाते आणि सर्व सन्माननीय सदस्यांना पाठवले जाते.