कृषि विभाग
परिचय:
कृषि विकास, व अन्न्य धान्याचे नगदी पिकांचे उत्पादन वाढविणे , आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती विकास करणे ,तालुका स्तरावर कृषि अधिकारी ,विस्तार अधिकारी,(कृषि),जिल्हा परिषदेकडे कृषि विषयक योजना ग्रामसेवकामार्फत गावपातळीवर शेतकऱ्यां पर्यन्त पोहचविणे. कृषि विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करणे व कोरडवाहू तसेच बागायत क्षेत्रातील शेती उत्पादनात वाढ करणे . बियाणे, खते किटकनाशके बाबत गुणवत्ता नियंत्रण विषयक कामकाज करणे, अल्पभूधारक, बहुभुधारक, अनु.जाती/जमाती, महिला शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर फवारणी स्प्रेपंप, सिंचनासाठी पाईप, इले. मोटार/ऑईल इंजीन, नांगर इत्यादी औजारे वाटप करणे, अनु.जाती व अनु. जमातीच्या शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर विहीर, एचडीपीई पाईप इ. घटकांचा लाभ देणे, बायोगॅस सयत्र बांधुन वापर करणाऱ्या सर्व पात्र लाभार्थींना केंद्र शासनाच्या अनुदानाचा लाभ देणे.