बंद

    ग्रामपंचायत विभाग

    विभाग प्रमुख
    पदनाम :- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) जि.प.नंदुरबार
    ईमेल – आयडी :- vpzpndb@gmail.com
    दुरध्वनी क्रमाक :-02564-210226
    प्रस्तावना

    73 व्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामपंचायतीना घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे.ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यांचे दृष्टीने व त्याची आर्थिक व सामाजिक प्रगती व्हावी या करिता केंद्र व राज्य शासनाकडुन विविध योजना ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जातात.नंदुरबार जिल्हयात एकुण 639 ग्रामपंचायत असुन त्यापैकी 566 पेसा क्षेत्रातील व व 73 नॉन पेसा क्षेत्रातील आहेत एकुण महसुल गांवे 946 असुन त्यापैकी 859 पेसा क्षेत्रातील व 87 नॉन पेसा क्षेत्रातील वाडे व पाडे 2800 आहेत.139 पेसा क्षेसातील गाव गाव घोषीत आहेत व 06 पंचायत समिती आहेत जिल्हयांची एकुण लोकसंख्या एकुण 639 ग्रामपंचायत असुन त्यापैकी 566 पेसा क्षेत्रातील व 73 नॉन पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायत आहे एकुण 06 पंचायत समिती आहेत. जिल्हयांचे भौगोलीक क्षेत्र 5955 चौ.कि.मी.असुन सन 2011 च्या जनगणनेनुसार एकुण लोकसंख्या 16,48,295 असुन त्यांत नागरी 2,75,474 व ग्रामीण 13,72,821 आहे तसेच अनु.जाती 47,985 व अनु.जमाती 11,41,933 आहे.

    ध्येय :-
    बळकट पंचायत राज व्यवस्थेमार्फत सर्व समावेशक व चिरस्थायी ग्रामविकास साधणे.

    कार्यदृष्टी
    1.पंचायत राज संस्थाचे सक्षमीकरण करणे.
    2. नियोजन,अमंलबजावणी व्यवस्थापन व नियंत्रणासाठी पंचायत राज संस्थाचे बळकटीकरण
    3.शासनाचे इतर विभाग, निमशासकीय संस्था,स्वयंसेवी संस्था,यांच्या कार्यक्रम व कार्यचा कृतीसंगम
    4.एकत्रित निर्णय,तक्रार निवारण्यासाठी ग्रामसभेद्वारे सामाजिक अंकेक्षण

    उददेश :-
    1. लोकप्रतिनिधीच्या प्रशिक्षणातुन पंचायत राज व्यवस्था बळकट करणे. :- जि.प.सस्दय ,प.स.सदस्य ,सरपचं, व ग्रा.प.सदस्य असे एकुण 2517 लोकप्रतिनिधी प्रशिक्षण घेण्यांत आले
    2. गावात मुलभूत सोयी सुविधा पुरविणे
    3. तीर्थक्षेत्रत विकासाठी मुलभूत साधने व सुविधा पुरविणे
    4. ग्रामसभेची प्रभावी अमंलबजावणी करणे
    5. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अमंबजावणी करुन दारिद्रय निर्मुलन करणे.
    6. 100 दिवसांचे उदिष्टे
    7. राजर्षी शाहु महाराज जेष्ठ साहित्यीक व कलावंत योजना