Close

    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

    परिचय
    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नंदुरबार कार्यालय विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजना राबवते.

    व्हिजन आणि मिशन
    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका प्रोत्साहन योजना, ग्रामीण गृहनिर्माण योजना यांचा समावेश होतो. जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचे काम या कार्यालयामार्फत केले जाते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची गरिबी दूर करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करते.

    उद्दिष्टे आणि कार्ये
    प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2016-17 ते 2024-25 पर्यंत एकूण उद्दीष्ट 250460 कुटुंबे प्राप्त झाली असून 100% लाभार्थी मंजूर झाले आहेत, त्यापैकी 112867 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 137593 अपूर्ण घरे आहेत, त्यांना माहे फेब्रुवारी 2025 अखेर या महीन्यात मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि त्यांना लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

    पुरस्कार
    o पुरस्काराचे शीर्षक : महा आवास अभियान २०२०-२१ , २०२१-२२ राज्यस्तरीय अंतर्गत मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे.
    o पुरस्काराचे वर्ष : 2020-21
    o पुरस्काराचे नाव : सर्वाधिक मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे.
    o सुविधा देऊन ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांचे मार्फत सर्वाधिक घरकुले पूर्ण करणे.
    o संघ सदस्य : मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, गट विकास अधिकारी
    o पत्ता : नंदुरबार जिल्हा
    o महा आवास अभियान २०२०-२१व २०२२-२३ सर्वाधिक घरकुल पूर्ण करणे बाबत राज्यस्तरीय व विभागस्तरीय पुरस्कार

    प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण
    o क्षेत्र: 269 Sq . ft Area

    लाभार्थी:
    1.सदर योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त होते केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरकुलांची किंमत रक्कम रु. 1, 20, 000/- निश्चित करण्यात आलेली आहे. रक्कम रु. 1, 20, 000/- पैकी नवीन घरकुलाच्या बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. या मध्ये केंद्र शासनाचा अनुदान हे PFMS प्रणालीव्दारे लाभार्थींच्या बँक खातेवर जमा करता येते.
    2.घर मंजुर करताना पहिला हप्ता अग्रीम रु. 15,000/-, पाया बांधकाम केल्यानंतर दुसरा हप्ता रु. 70,000/-, छतापर्यंत बांधकाम केल्यानंतर तिसरा हप्ता रु. 30,000/-, घरकुल पुर्ण केल्यानंतर चौथा हप्ता रू. 5000/-. वितरीत करण्यात येतात.
    3. घरकुल बांधकाम पूर्ण वेळी शौचालयाचे देखील बांधकाम करावे लागते.

    फायदे:
    1.सदर योजनेतंर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरकुलांची किंमत रक्कम रु. 1, 20, 000/- निश्चित करण्यात आलेली आहे. रक्कम रु. 1, 20, 000/- पैकी नवीन घरकुलाच्या बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. या मध्ये केंद्र शासनाचा अनुदान हे PFMS प्रणालीव्दारे लाभार्थींच्या बँक खातेवर जमा करता येते.
    2.घर मंजुर करताना पहिला हप्ता अग्रीम रु15,000/-, दुसरा हप्ता रु. 70,000/-, तिसरा हप्ता रु. 30,000/-, चौथा हप्ता रू. 5000/-.
    3. घरकुल बांधकाम पूर्ण वेळी शौचालयाचे देखील बांधकाम करावे लागते.
    Gov web site -https://pmayg.nic.in