बंद

    समाज कल्याण विभाग

    प्रस्तावना :-
    कार्यक्षेत्र :- जिल्ह्याचे ग्रामिण क्षेत्र
    विभागाचे प्रमुख कार्य :- ग्रामिण भागातील जनतेस अनु.सूचित जाती,अनु. सूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व नवबौध्दांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणे.

    ध्येय :-
    ग्रामिण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचे जीवनमान उंचविण्यासाठी केंद्रशासन, राज्यशासन तसेच जिल्हा परिषद अंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविणे.

    मिशन :-
    • ग्रामिण भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यांना शेती उपयोगी साहित्ये पुरविणे. उदा. ताडपत्री, पाईप, इलेक्ट्रीक मोटार इ.
    • अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे.
    • मागसवर्गीय मुला मुलींना मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना राबविणे.
    • इयत्ता 5 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुला मुलींसाठी अनुदानित वसतीगृहात प्रवेश देण्यात येते.

    उद्दिष्टे :-
    1. ग्रामिण क्षेत्रातील अनु. जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुखसुविधा पुर्ण करणेसाठी अशा वस्त्यांमध्ये स्वच्छताविषयक सोयी, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पोहोच मार्ग, प्रकाश व्यवस्था, समाज मंदीर इत्यादी व्यवस्था करून स्थिती सुधारण्या संबंधी अनु. जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे ही योजना राबविण्यात येत आहे.
    2. 20% सेस फंड योजनेंतर्गत जिल्हा परिषद आपल्या उत्पन्नाच्या 20% इतकी रक्कम प्रति वर्षी अनु.सूचित जाती, अनु. सूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, व नवबौध्दांसाठी राखुन ठेवून सदर रक्कम मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करण्यात येते.
    3. स्वयंसेवी संस्थेमार्फत अनुदानित वसतीगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परिपोषण अनुदान देण्यात येते व वसतीगृहातील कर्मचाऱ्यांना दरमहा मानधन अदा करण्यात येते.
    4. आंतरजातीय विवाहीतांस प्रोत्साहनपर योजने अंतर्गत लाभार्थी जोडप्यांना रक्कम रु. 50000/- लाभ देण्यात येते.
    5. मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजने अंतर्गत इयत्ता 5 वी ते 10 वी मध्ये शिकरणाऱ्या मागासवर्गीय मुला मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करणे
    6. राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजने अंतर्गत लाभार्थी कलावंतांना लाभ देणे.

    माहितीचा अधिकार :-
    १. सहाय्यक जन माहिती अधिकारी
    श्री.‍ अविनाश लक्ष्मण सोनवणे
    समाज कल्याण ‍निरिक्षक,
    समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार
    २. जन माहिती अधिकारी
    श्री. अविनाश लक्ष्मण सोनवणे
    समाज कल्याण ‍निरिक्षक,
    समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार
    ३.प्रथम अपीलीय अधिकारी,
    श्री. लालू जेगला पावरा
    जिल्हा समाज कल्याण अधिकारी
    समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार