बंद

    पाणी आणि स्वच्छता विभाग

    विभागाबद्दल माहिती
    जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन हा जिल्हा परिषदेमध्ये एक महत्वाचा विभाग आहे. प्रकल्प संचालक जल जीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व स्व.)(जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन ) हे या विभागाचे प्रमुख आहेत. वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन, मैलागाळ व्यवस्थापन, प्लॉस्टिक वेस्ट मॅनेजमेंट व स्वच्छतेविषयक विविध विषयावर प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम या विभागामार्फत राबविले जातात.

    दृष्टी आणि ध्येय
    * वैयक्तिक शौचालय –
    केंद्र शासनाने 15 ऑगस्ट 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन योजना सुरु केली आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या योजनेतून ग्रामपंचायत स्तरावरील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पायाभुत सर्वेक्षणांनुसार पात्र असलेल्या कुटुंबास वैयक्तिक शौचालय प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात येतो. नंदुरबार जिल्हा 02 ऑक्टोंबर २०१८ रोजी हागणदारी मुक्त जिल्हा घोषित करण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन तसेच स्वच्छतेविषयक जनजागृतीपर कार्यक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यत येतात.

    * संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान:-
    ग्रामस्वच्छता कार्यक्रमाचा मुळ उद्देश ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्याचा आहे. ग्रामीण जनतेस हा कार्यक्रम आपला वाटावा व त्याचे महत्व पटवुन त्यांना उत्स्फूर्त सहभाग मिळावा या दृष्टिकोनातून सन 2000-2001 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा राबविण्यात येत आहे. तसेच सन 2002-03 पासुन स्वच्छतेशी व ग्रामविकासाशी निगडीत एखादया विशिष्ट क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या ग्रामपंचायना तालुका,जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विशेष बक्षिसे देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला. सन 2018 – 19 पासुन शासन स्तरावरुन दरवर्षी नव्याने मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात येतात. त्याअनुषंगाने सन 2018-19 पासून संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेमध्ये ग्रामपंचायत स्तरावरील उत्कृष्ट प्रभागास व जिल्हा परिषदेतील गटातील स्वच्छता क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या उत्कृष्ट ग्रामपंचायतीस बक्षिस प्रदान करण्यात येत आहे.
    * ओडीएफ प्लस– स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अंतर्गत गाव हागणदारी मुक्त अधिक अर्थात ओडीएफ प्लस करणे हे उद्दिष्ट असून आज अखेर जिल्ह्यातील 601 गावे ओडीएफ प्लस घोषित करण्यात आली आहे. उर्वरित गावे देखील टप्प्या टप्प्याने ओडीएफ प्लस घोषित करण्यात येणार आहेत. सन २०२४-२५ आर्थिक वर्षात कृती आराखड्यातील 879 गावांपैकी 57 आणि पूर्वीची 544 अशी एकूण 601 गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण झाली आहेत.

    उद्दिष्टये आणि कार्य
    o अ. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजना गावपातळीवर राबविल्या जातात.
    o आ. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या केंद्र पुरस्कृत योजनेतून पात्र लाभार्थ्यांना रुपये 12,000/-वैयक्तिक शौचालय प्रोत्साहन अनुदान या विभागामार्फत देण्यात येते. तसेच, सार्वजनिक शौचालय बांधकाम व घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प गावपातळीवर राबविले जातात.
    जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छते विषयक विविध विषयांची प्रशिक्षणे व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात.

    नागरिकांच्या विषयी
    सेवा

    वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिकशौचालय बांधकाम,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन, मैलागाळव्यवस्थापन, प्लॉस्टिक वेस्ट मॅनेजमेंट व स्वच्छतेविषयक उपक्रम या विभागामार्फत राबविले जातात.

    योजना –
    स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेतून केंद्र हिस्सा ६०% व राज्य हिस्सा ४०% अनुदान मिळते.
    गोबरधन प्रकल्प बामखेडा त. त. ता. शहादा
    rr