बंद

    पशुसंवर्धन विभाग

    प्रस्तावना
    एैतिहासीक पार्श्वभूमी बघता, राज्यातील पहिला पशुवैदयकिय दवाखाना धुळे व नाशिक येथे 1 एप्रिल 1892 रोजी कार्यान्वित झाला आहे. भारत हा शेतीप्रधान देश असुन भारतात कृषि क्षेत्राशी संबंधीत असा पशुसंवर्धन विभाग आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागास अन्यन्य साधारण महत्व आहे. पशुपालन/दुग्धव्यवसाय हा दुय्यम व्यवसाय न राहता एक प्रमुख व्यवसाय होऊ पाहत असुन पशुसंवर्धनाचे कार्य या विभागामार्फत करण्यात येते. 21 व्या शतकातील शेतकरी पशुपालक व दुग्धव्यावसायिक यांच्यासमोरील आव्हाने लक्षात घेता विभागाची वाटचाल उदयोजकतेच्या दिशेने होणे अपेक्षित आहे. याशिवाय पशुधनाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी पशुपालकाकडील कमी उत्पादीत गाय / म्हैस यांना कृत्रिम रेतन करण्यात येवुन संकरीत पैदास निर्माण करुन दुग्धोत्पादनात वाढ करणे व पशुपालकांची अर्थिक उन्नती करणे, आजारी पशुधनावर वेळेत औषधोपचार करुन मौल्यवान जनावरांचा जिव वाचविणे तसेच निरनिराळया रोगावर प्रतिबंधक लसीकरण करणे, शेतक-यांना / पशुपालकांना तांत्रिकदृष्टया किफायतशिर पशुपालन करणे बाबतचे पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे तसेच पर्यायाने राष्ट्रीय संपत्तीमध्ये वाढ करणे असे प्रमुख उद्देश व ध्येय पशुसंवर्धन विभागाचे आहे.

    ध्येय
    १ पशुसंवर्धनाच्या सुधारित तंत्रज्ञानाद्वारे पशुधनास आरोग्यविषयक सेवा देणे.
    २ पशुपालक ते पशुउद्योजक तयार करणे.
    ३ जिल्हयामध्ये आर्थिक व पोषणविषयक विकासाची शाश्वती देणे.

    मिशन
    पशुपालकांचे उत्पन्न्‍ा दुप्पट करणे. व चांगल्या प्रतीचे प्राणीजन्य्‍ा प्रथिने उपलब्ध करून देणे. ग्रामिण भागात पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनामार्फत स्वयंरोजगार व रोजगार निर्मीती करून शाश्वत अर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे. केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या माध्यमातून, उदयोजकता विकास करणे.

    उद्दिष्टे आणि कार्ये
    1. जिल्ह्यातील पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक तांत्रिक सेवा पुरविणे हे पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नंदुरबार या विभागाचे प्रमुख कार्य आहे.
    2. पशुसंवर्धन विभागाच्या अधिनस्त्‍ा असलेल्या पशुवैदयकिय दवाखान्यांच्या माध्यमातून दुधाळ जनावरे, शेळी गट वाटप या वैयक्तिक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी करून ग्रामीण शेतकरी व गरजू लाभार्थ्यांना, पुरक उत्पन्नाचे व स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देणे.
    3. पशुपैदास धोरणांची प्रभावी अंमलबजावणी – कृत्रिम रेतनाव्दारे पशुधनामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून उत्पादकता वाढविणे.
    4. पशुधनाचे रोगराईपासून संरक्षण करुन जास्त दुध उत्पादन, अंडी उत्पादन, मांस, लोकर ही पशुजन्य उत्पादने वाढविणे.
    5. पशुधनास लागणाऱ्या वैरण व पशुखाद्याची उपलब्धता वाढविणे.
    6. पशुधनास लागणाऱ्या लसींची उपलब्धता व लसीकरण करणे.
    7. प्रसिध्दी व प्रचार कार्यक्रमाअंतर्गत पशुपालकांपर्यंत पशुसंवर्धन विषयक योजनांची माहिती पुरविणे.