जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
परिचय
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नंदुरबार कार्यालय विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजना राबवते. कार्यालय एक स्वायत्त संस्था आहे आणि संस्था नोंदणी अधिनियम 1860 नोंदणी क्रमांक महा/951/15/ठाणे, दिनांक 26 जून 2015 अंतर्गत सहायक निबंधक, ठाणे प्रदेश ठाणे यांच्याकडे नोंदणीकृत आहे.
व्हिजन आणि मिशन
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका प्रोत्साहन योजना, ग्रामीण गृहनिर्माण योजना यांचा समावेश होतो. जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचे काम या कार्यालयामार्फत केले जाते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची गरिबी दूर करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करते.
उद्दिष्टे आणि कार्ये
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2016-17 ते 2021-22 पर्यंत एकूण 12903 कुटुंबे प्राप्त झाली असून 100% लाभार्थी मंजूर झाले आहेत, त्यापैकी 11440 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 1463 अपूर्ण घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, आवास प्लस फॉर्म डी अंतर्गत उर्वरित 65750 लाभार्थ्यांना राज्य गृहनिर्माण कार्यालयामार्फत प्राप्त उद्दिष्टानुसार घरांचे वाटप केले जाईल.